श्री गुरु पद्मनाभस्वामी कार्यक्रम
श्री सद्गुरु पद्मनाभस्वामी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव
श्री सद्गुरु पद्मनाभस्वामी उर्फ श्री नारायणबुवा यांची ११४ वी पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा झाला. दिनांक २३.०४.२०१५ ते शुक्रवार दिनांक ०१.०५.२०१५ या काळात हा महोत्सव साजरा झाला.
दि. २३.०४.२०१५ पासून सकाळी ६.०० वा. काकडारती, त्यानंतर श्रींच्या समाधीस पंचामृत अभिषेक आणि नंतर मंगलारती. ठीक ९.३० वा. श्री गुरुचरित्र पारायण, ११.३० वा. आरती आणि नैव्यद्य, दुपारी ३. ३० वा. गीत गोविंद (अष्टपदी), ४.३० वा. महिलांचे भजन, ६.१५ वा. श्रींची सायं आरती, स्तोत्रे. ठीक ९.३० वा. पुरुषांची भजने असा दैनंदिन कार्यक्रम दि. २९ तारखेपर्यंत होता. दि. ३० रोजी श्रींच्या पुण्यातीथीचा दिवस सकाळी पंचामृत स्नान, लघुरुद्राभिषेक, ठीक ११.३० वा. सर्वाना महाप्रसाद वाटप, पंगत आणि दि. ०१.०५.२०१५ सायंकाळी ६.०० ते ७.३० श्री त्र्यंबकबुवा शेजवळकर (चाळीसगांव) यांचे काल्याचे कीर्तन, नंतर श्रींची सायं आरती आणि नंतर श्रींच्या पालखीची गांवातून मिरवणुक निघाली.
विशेष कार्यक्रम :-
- दि. २९-३० एप्रिल २०१५ रोजी संध्याकाळी ७.०० ते ८.३० वा. श्री जामकर यांची प्रवचने
- दि. ३० एप्रिल २०१५ रोजी संध्याकाळी ७.३० वा. श्री स्वामींच्या नावाने असलेली www.alandicheswami.org या वेबसाईटचे पुणे येथील श्री अण्णासाहेब पटवर्धन मंदिराचे व्यवस्थापक श्री काळे यांचे हस्ते उद्घाटन
- एकादशीला श्रींच्या समाधीस श्री गणेशाचे रिद्धी-सिद्धी सहरूप दिले गेले. हा कार्यक्रम “चंदन उटी” म्हणून ओळखला जातो.